जावळी काबीज झाली. 15 जानेवारी 1656 या दिवशी महाराज जातीनिशी जावळीत आले. शंभू महादेवाची... महाबळेश्वराची जावळी स्वराज्यात सामील झाली. या युद्धात चंद्ररावांकडून लढणारा एक योद्धा महाराजांनी स्वराज्यात सामील केला - मुरारबाजी देशपांडे, तुम्हांमध्ये पुरुषार्थ असला, तर उदईक येत असाल तर आजच या!" जावळीच्या घनदाट जंगलात राज्य करणार्या चंद्रराव मोर्यांनी छत्रपति शिवाजी महाराजांना डिवचलं. महाबळेश्वर, मकरंदगड आणि पारघाटाच्या डोंगरांच्या दाटीत चंद्रराव मोर्यांची जावळी वसली होती. जावळीच्या जंगलात राज्य करायला वाघाचेच काळीज हवे आणि मोऱ्यांचे काळीज खरोखर वाघाचेच होते. म्हणूनच मोरे जावळीत पिढ्यान्पिढ्या दौलत थाटून बसले होते. मोरे आदिलशहांचे मांडलिक सरदार होते. 'चंद्रराव' हा मोऱ्यांचा पिढीजात किताब होता. आदिलशहाची अवकृपा झाली आणि मोऱ्यांची दौलत जप्त करण्याचा हुकूम सुटला, पण छत्रपति शिवाजी महाराजांच्या पाठबळामुळे यशवंतराव मोरे 'चंद्रराव' झाले. चंद्रराव आपला भाऊबंद प्रतापराव मोरे व कारभारी हणमंतराव मोऱ्यांसवे जावळीचा कारभार पाहू लागले. काही चुगलखोर चंद्रराव व हणमंतरावांच्या कानाला ला...
ने मजसी ने परत मातृभूमीला । सागरा, प्राण तळमळला भारत भूमीच्या स्वातंत्रतेसाठी कोठलीही किंमत मोजू पण स्वातंत्र्याची देवता आम्ही प्रसंन्नच करू ही जिद्दीची असा ठेवणारे विनायक दामोधर सावरकर स्वतंत्र वीर सावरकर यांचा जन्म २८ मे १८८३ रोजी नाशिक जिल्ह्यातील भगूर यागावी राधाबाई यांच्या पोटी झाला. वडील दामोधर सावरकर यांना एकूण तीन अपत्य त्या पैकी विनायक हे दुसऱ्या क्रमांकाचे. विनायक यांचे वडील हे व्यवसायाने सावकार. विनायक नऊ वर्षाचे होते तेव्हा त्यांच्या आईचे छत्र त्यांच्या पासून हिरावले. मोठया काकूने त्यांचा सभांळ केला. पुढे इंग्रजांच्या अत्याचारमुळे त्यांची सावकिरी गेली. आणि त्यातच प्लेग रोगाच्या साथी मध्ये वडीलही वारले. मोठया काकांना इंग्रजांनी एका आंदोलनात गोळी झाडली, असे अनेक संकटे भघितल्यावर तुळजा माते पुढे शिवराया प्रमाणे प्रण घेतला की शेवटच्या स्वासा पर्यंत इंग्रजां बरोबर संघर्ष करत राहील. स्वातंत्रवीर सावरकर हे बालपणापासूनच हुशार होते. सावरकर हे छत्रपती शिवराय यांच्याकडून प्रेरित होते. काळ्या पाण्याची शिक्षा दिल्यावर इंग्...