छत्रपती शिवराय बालपणापासूनच शांत व विचारी स्वभावाचे होते, कोणताही नवीन निर्णय घेण्या अगोदर ते अनेक बाजुंनी त्या गोष्टीचा विचार करत. पूर्ण गुप्तचरां कडून योग्य माहिती मिळाल्यावर ते पुढची योजना राबवत.
कोणत्या किल्यावर ते हमला करणार आहे. याविषयी काही वेळा जिजाऊ महासाहेब यांना सुद्धा माहीत नसतं. एवढंच काय तर जे सैनिक शिवराया बरोबर कामगिरीवर जात त्यांना सुद्धा शिवराय कोणता किल्ला, व कोणती कामगिरी बजावणार आहे याचा पत्ता सुद्धा लागत नसे. अफजलखान वधाच्या वेळी शिवरायांनी कोणती योजना बनवली आहे याची माहिती जिजामाता सह बाकी इतर कोणालाही नव्हती. एवढी छत्रपती शिवराय गुप्तता राखत.
याचे मूळ कारण बघितले तर दुष्मणाला कुठल्याही पद्धतीने आपण घेणारे निर्णय कळू न देने. अदिलशाही किंवा मुघलशाही असो या शाही मध्ये सुद्धा गुप्तचर ठेवत. त्यामुळे नव उमळलेलं हे स्वराज्य बघण्यासाठी शिवरायांना अधिक सावधगिरी बागळणे आवश्यक होते. शिवाय शिवरायांचेच अनेक नातेवाईक शरीराने शिवरायनकडे आणि जहागिरीसाठी मनातून आधीलशाही मुघलशाही यांच्याकडून होते.
शिवाय गुप्तता ठेवल्या मुळे किल्ल्यावर हल्ला चढवल्या वर अधिक रक्त सांडवण्याची गरज पडत नसे.याला एकप्रकारे शिवरायांचा गनिमीकावाच म्हटले हवे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा