जनतेसाठी व जनतेच्या विकासासाठी जर संपूर्ण तिजोरी जरी मुक्त झाली तरीही चालेल. स्वतः राजा आहे पण धनाचा वापर जनतेसाठी स्वतःचे जीवन आनंदी बनवण्यासाठी नाही ,असे विचार करणारे राजर्षि शाहू महाराज.
छत्रपती व राजर्षि शाहू महाराज, कोल्हापूरचे शाहू किंवा चौथे शाहू महाराज म्हणून ओळखले जाणारे. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज. राजर्षि शाहू महाराज यांनी त्यांच्या कालावधीत अनेक सामाजिक कार्य केले. त्यातील काही पुढील प्रमाणे.
१. शिक्षणाकडे लक्ष
राजर्षि शाहू महाराजयांनी प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे केले. महिला शिक्षणाकडे त्यांनी विशेष लक्ष दिले त्याच बरोबर मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिक्षणकडे ही त्यांनी लक्ष दिले.
२.अनेक चुकीच्या प्रथेला विरोध
भारतात त्या कालावधीत अनेक चुकीच्या प्रथा होत्या, ज्यामुळे सामान्य जनता व महिला या जाचात भरडून निघत. यामुळे शाहू महाराजांनी सती प्रथा, केस वेपन अशा प्रथा बंद केल्या.
३.जातीय भेदाभेदास विरोध
त्या कालावधीत मागासवर्गीय समाजाकडे खुप डावलून बघितले जाई. त्यांना शिक्षणाचा अधिकार नव्हता तर कुठलेही महत्वाचे पद किंवा अधिकार दिला जात नसे. पण शाहू महाराजांनी या गोष्टीला आळा घालण्यासाठी मागासवर्गीया साठी अनेक महत्वाचे निर्णय घेतले. समाजातील भेदाभेद निघून जावा यासाठी त्यांनी उच्च वर्गीय व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना एकाच शाळेत शिक्षण दिले जाऊ लागले. त्याच बरोबर आपल्या स्वतःच्या भहिणीचा विवाह धनगर समाजातील यशवंतराव होळकर यांना दिली. तसेच १०० मराठा व इतर समाजाचे विवाह घडून आणले.
४.शेतकऱ्यांसाठी कार्य
शेतकरी सबळ व शिक्षित व्हावा यासाठी शाहू महाराजांनी छत्रपती स्पिनिंग अँड वीव्हिंग मिल’, शाहुपुरी व्यापारपेठ, शेतकऱ्यांची सहकारी संस्था, शेतकी तंत्रज्ञानाच्या संशोधनासाठी ‘किंग एडवर्ड अॅग्रिकल्चरल इन्स्टिट्यूट’ इत्यादी संस्था कोल्हापुरात स्थापण्यात त्यांचा प्रमुख वाटा होता. राधानगरी धरणाची उभारणी, शेतकऱ्यांना कर्जे उपलब्ध करून देणे अशा उपक्रमांतूनही त्यांनी कृषिविकासाकडे लक्ष पुरवले.
५.बाबसाहेब आंबेडकर यांच्या कार्याचे कौतुक
हा राष्ट्र कोणाचा तर शाहू फुले आंबेडकरांचा असे आपण म्हणतो. शाहू महाराजांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचे कौतुक केले. पुढील कार्यास अनेक ठिकाणी आर्थिक मदत केली.
अशा थोर व्यक्तीचा देहान्त ६ मे १९२२ रोजी कोल्हापूर येथे झाला. असा राजा होणे नाही ही जनता म्हणते ते काही खोटें नाही शिवरायांकडून प्रेरित झालेले शाहु महाराजानी अनेक कार्य केले.
राजर्षि शाहू महाराजांच्या पुण्यदिनी निमित्त त्यांना विनम्र अभिवादन🙏
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा