शहाजी महाराजांनी छत्रपती शिवरायांवर पुण्याचा जहागीर सोपवली. त्यावेळी शिवराय लहान होते. त्यामुळे दादोजी आणि जिजाऊच पुण्याचा करोभार पाहत होतो. नेस्त नाबूत केलेल्या पुण्यात सुरुवातीला शिवरायांना व जिजाऊंना राहण्यासाठी व करोभार बघण्यासाठी जागा नव्हती. राजमाता जिजाऊ यांच्या आदेशाने दादोजींनी लाल महालाचे काम सुरू केले. पुण्यात जनता पुन्हा येऊन काम करावी यासाठी दादोजींनाही युक्ती मिळाली लाल महालाचे काम त्यांनी जोरात सुरू केले.
ही जागा बघताना दादोजींनी अनेक छोटया छोट्या गोष्टी लक्षात घेतल्या. पाणी मुबलक हवे, जंगली जनावरापासून दूर ,आणि असे ठिकाण ज्यापासून जहागिरीव र लक्ष ठेवता येईल. आणि जनतेला फिर्याद मांडण्यासाठी जवळचे स्थान असेल.
लाल दगडांनी बांधले म्हणून लाल महाल नाव ठेवण्यात आले. लाल महाल हा पुणे शहराच्या मध्यभागी असून कसबे पेठ यामध्ये जिजामाता उद्यानात आहे. हे उद्यान १९८८ साली महिला व लहान मुलांसाठी बनवले होते. जवळच शनिवार वाडा, आणि गणपतीचे भव्य मंदिर आहे.
शिवरायांचे सर्व लहानपणीचे बालपण याच महालात गेले. शाहिस्तेखान मामा जेव्हा पुण्यात आले. तोपर्यंत शिवरायांनी अनेक किल्ले गड जिंखले होते. लाल महाल एक छोटीशी वस्तू आहे. जी फक्त शिवरायांचं पुण्याचा करोभर बघण्या साठी होती. तरीही शिवराय याच महालात अनेक वर्षे राहत होते. त्यामुळें जेव्हा शिवराय पन्हाळ्यात अडकले. त्याचं वेळी शाहिस्तेखान या महालात तब्बल तीन वर्षे राहिला. पण ज्या शिवरायांचे बालपण ज्या महालात गेले त्याचा काना आणि कोपरा शिवरायांना माहीत होता. त्यामुळेच फक्त ४०० मावळ्यांसह शिवरायांनी शाहिस्तेखानाची फजिती केली
आजच्या कालावधीत जर पाहिले तर लाल मालाचे अस्तित्व मिटलेले पुण्यात आढळते. त्यामुळे अनेक शिवप्रेमी लाल महालाच्या मूळ जगेला शोधण्याचा प्रयत्न करत आहे. आज जो महाल आहे तो पुणे महानगरपालिका यांनी त्याच सारखी एक प्रतिकृती बनवली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा