ज्या वयात आपल्याला शाळेतील बाराखडी व्यवस्थित येत नाही, त्या वयात रवींद्र नाथ टागोर यांनी कविता लिहिणे चालू केले होते.
रवींद्रनाथ टागोर यांचा जन्म ७ मे १८६१ रोजी कोलकात्यातील जोराशनग येथील पिराली या ब्राम्हण कुटुंबात झाला. वडिलांचे नाव देवेंद्रनाथ तर आईचे नाव शारदा देवी. देवेंद्रनाथ यांना एकूण १४ अपत्य होती. त्यात रवींद्रनाथ १३ वे. लहानपणापासूनच रवींद्रनाथ यांना काव्य लेखन कथा लेखन यात रस होता. वयाच्या १६ व्या वर्षीच त्यांनी भारत भ्रमण करण्याचा निर्णय घेतला.
पुढे ब्यारिस्टर होण्यासाठी ते लंडनला गेले.पण कोठलीही पदवी न घेता ते भारतात परतले. बंगालला परतल्यावर त्यांनी मृणाली देवी यांच्याशी विवाह केला. रवींद्रनाथ यांना एकूण ५ अपत्य झाली. पण त्यातील २ अपत्य वारली.
पुढे रवींद्र नाथाच्या वडिलांचे निधन झाल्यावर ते आपली घरची मालमत्ता सभाळण्यासाठी जन्म गावी परतले. पण येथेच त्यांच्या पत्नी व तीनही अपत्याचा मृत्य झाला.
अनेक दुःख झेलण्या नंतरही त्यांनी गीतांजली हा जगप्रसिद्ध ग्रंथ लिहिला. यासाठी त्यांना नोबेल पुरस्कार ही मिळाला.भारतात त्या वेळी इंग्रजी सत्ता असल्याने त्यांच्या पुरस्कारासाठी इंग्रजांनी सर ही पदवी दिली. पण पुढे जालियनवाला हत्याकांडात व्यथित होऊन ही पदवी सोडून दिली.
महात्मा गांधी बरोबर त्यांच जवळच नात महात्मा गांधीही रवींद्रनाथ यांना मनापासून मानत.
रवींद्रनाथ टागोर यांनी महाराष्ट्राला भेट दिल्यावर त्यांना तुकोबारायांचे अभंग मनापासून आवडले. त्यांनी अनेक महाराष्ट्रातील संतांचे अभंग,ओव्या, भारुड यांना विविध भाषेत भाषांतरित केले. छत्रपती शिवरायांचा इतिहास वाचल्यावर रवींद्रनाथ खूप प्रेरित झाले होते.
वयाच्या ६० व्या वर्षी त्यांनी चित्र कलेला प्रारंभ केला. यातून त्यांनी दर्शवले की कलेला व कर्तव्याला वयाचे बंधन नसते.
अशा थोर व्यक्तिमत्वाच्या जन्म दिनी त्यांना विनम्र अभिवादन.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा