छत्रपती शिवरायांच्या आदिलशाही विरुद्ध कार्यवाही सुरूच होती.तोरणा, पुरंधर, रायरेश्वर घेतल्यानंतर शिवराय पुढील कोणती कामगिरी हातात घेतात, यासाठी लाल महालात बैठका बसू लागल्या. या बैठकीत तानाजी, येसाजी, बाळाजी, चिमणाजी वैगेरे मंडळी हजर असायची.
एकदा बैठकीत शिवरायांनी दर्शनासाठी अर्धी फौज घेऊन बाहेर पडायचे ठरवले. पण यातील कोणालाच काही माहीत नव्हते, सर्वाना वाटले की शिवराय पुन्हा रायरेश्वराच्या दर्शनासाठी चालले आहे. पण अर्ध्या मार्गावर शिवारायनी मार्ग बदलला आणि चाकणची वाट पकडली. सर्व चकित झाले. काहींना वाटले की शिवराय चाकण घेण्यासाठी निघाले आहेत. तानाजीने अदबीने विचारले की राज चाकण घेण्याचा विचार दिसतोय , यावर शिवराय म्हणाले की "आई भवानी जी बुद्धी देईल ते करू.
शिवराय चाकण किल्याच्या दरवाज्या समोर फौज घेऊन उभे राहिले. हवलंदाराला काहीच कळेना. चाकण किल्याचे किल्लेदार होते फिरंगोजी नरसाळा. फिरंगोजी स्वभावाने धार्मिक व कर्मठ होते. मातृभूमी वर त्यांना प्रेम होते. पण पिढी जात त्यांना आदिलशाहीचा किल्ला राखण करावा लागत होते. शिवराय माणसे ओळखून होते, त्यामुळे त्यांनी फिरंगोजींचा स्वभाव आधीच जाणला होता.
फिरंगोजी मोठ्या चिंतेत पडले, आधीलशाहिला ही भेट कळाली तर, पण मोठ्या धेर्याने त्यांनी द्वार उघडण्यास सांगितले. शिवराय त्यांच्या फौजे सह आत आल्यावर मोठया अदबीने फिरंगोजी शिवराया समोर गेले. भेटी चे कारण विचारल्यावर तुम्हास भेटण्यास आलो. फिरंगोजी जाणत होते की शिवरायांनी पुरंधर चा किल्ला कसा चलाखी ने घेतला.
फिरंगोजीने शिवरायांना ताकीद दिली की जर तुम्ही चाकणच्या किल्यावरही दगा फटका करण्याचा प्रयत्न केला, तर खपून घेतले जाणार नाही.
शिवरायांनी तानाजीच्या कानात काहीतरी सांगितले, व तानाजी सारी फौज घेऊन किल्या बाहेत पडला. यावेळी शिवराय फिरंगोजीना म्हणाले की "जर आत्ता तुम्ही ठरवले तर तुम्ही आमच्या बरोबर दगा फटका करू शकता, पण तुम्ही असे करणार नाही. पुरंधरचा किल्लेदार निळोजी उपभोगी होता. पण तुम्ही तसे नाही. हिंदूचे चाललेले हाल तुम्हालाही कोठेतरी थांबवावे असे वाटते. मग तुम्ही या आदिलशीत कशाला? ,स्वराज्यात या तुमची स्वराज्याला आवश्यकता आहे. या म्लेंच्छनी भारत भूमी पूर्ण बाटवली, येथे आपल्या आया बहिणी सुरक्षित नाही, मंदिर सुरक्षित नाही तेथे तुम्ही कितीवेळ सुरक्षित राहणार".
शिवरायांचे शब्द फिरंगोजींच्या मानत घर करत होतेे .पण एवढ्या मोठ्या पातशाहीचा सामना करायचा तरी कसा असे शिवरायांना विचारल्यावर . शिवराय म्हणाले की "हेच मुघल आधी निर्वासित म्हणून आले आणि आपल्या डोक्यावर आत्ता नाचताय आपनही तसच करायचं, आणि तसही आदिलशाही दरबारात हिंदू सरदारा विषयी कानभरनी तेथे चालूच असते, तो पातशहा कधी तुमच्या विरोधात जाईल सांगता येणार नाही".
शिवरायांनी अशा अनेक प्रकारे फिरंगोजींची समजूत घातली. शिवरायांचे विचार पटल्यावर फिरंगोजी शिवरायांना म्हणले की "राजे किल्ला तुमचा तुम्ही ठरवा तस होईल "यावर शिवराय म्हणाले की "आम्हाला गड नको हवे आहेतर तुमच्या सारखे असे दहा किल्ले जिंकणारे मानस किल्ला तुमचा आणि तुमचाच राहील या शब्दांनी फिरंगोजींचे मन भरून आले व त्यांनी शिवरायांना मिठी मारली. किल्ल्यावर काही कालावधीत भगवा फडकू लागला.
मित्रानो शिवरायांनी याच प्रकारे युद्ध न करता शांतीने व समजूतदार पणे अनेक किल्ले आदिलशाहीच्या व मुघलांच्या नाका खालून स्वतःच्या ताब्यात आणले.
समर्थ रामदास स्वामींचे शिवरायांना व समाजाला मौल्यवान संदेश
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा