छत्रपती शिवरायांची सर्वात प्रथम जयंती साजरी केली असेल तर ती म्हणजे महात्मा जोतीराव फुलेंनी. त्यांनीच सर्वप्रथम शिवरायांची समाधी शोधली. व 1869 रोजी जयंती साजरी केली. पण त्यांनी जी जयंती साजरी केली, ती शिवकालीन बखरींनी नमूद केलेली तारीख होती. यानंतर जेव्हा लोकमान्य टिळकांनी पुण्यात एप्रिल 1900 च्या दरम्यान शिवरायांची जयंती साजरी केली. याचा सविस्तर उहापोह त्यांनी केसरी वृत्तपत्रात 14 एप्रिल 1900 रोजी केला आहे.
यात मुख्य कारण जर पाहिले तर शिवरायांचा जन्म ज्या कालावधीत झाला. तो कालावधी धामधुमीचा होता. शहाजीराजे आदिलशीहीशी बंड करून बंगळूरला होते. व जिजामाता या शिवनेरी किल्यावर होत्या. जिजाऊंच्या रक्षणासाठी किल्लेदराने किल्ला पूर्ण कडे कोट बंद केला होता. या धामधुमीच्या कालावधीत बखरी यांच्या कडून योग्य तारीख बखरीत लिहिणे राहून गेली असेल असे एक कारण आढळते. शिवाय शिवरायही स्वतःचाच महिमा गुणगान किंवा इतिहास लिहून घेणाऱ्यामधले राजे नव्हते. स्वराज्याच्या कार्यात ते इतके व्यस्त होते, की त्यांच सार आयुष्य मुघल ,आदिलशाही यांच्याशी संघर्षात व स्वराज्य स्थापन करण्यात गेले.
दुसरे कारण जर पाहिले तर इंग्लिश कालगणना आणि मराठी कालगणना यांतील साम्य. शिवरायांचा जन्म मराठी कालगणनेनुसार सध्याच्या 19 फेब्रुवारी 1630 या तारखेच्या म्हणजेच फाल्गुन वद्य तृतिया, शके 1551 शुक्ल संवत्सर या तिथीच्या ऐवजी पूर्वी छ. शिवाजी महाराजांच्या जन्माची तारीख वैशाख शुद्ध द्वितिया शके 1549 मानली जात असे. इंग्रजी कॅलेंडरप्रमाणे हा दिवस होता 6 एप्रिल 1627.
(त्यामुळे जेथे शके 1549 येते तेथे इसवी सन 1627 आणि शके 1551 येते तेथे इसवी सन 1630 साल स्मरणात ठेवावे. शालीवाहन शक आणि इसवी सन यांच्यामध्ये 78 वर्षांचा फरक आहे.)
भारत व महाराष्ट्र सरकारने 19 फेब्रुवारी ही तारीख स्वीकारली आहे. तर काही जण ही 13 मे या दिवशी साजरी करतात.
याठिकाणी छत्रपती शिवरायांची जन्म तारीख कोणती असेल हे सांगण्या एवढी माझी क्षमता नाही . पण शिवरायांच्या वर्षातील प्रत्येक दिवसाला जन्मतारीख मानून त्या दिवशी शिवरायांकडून एक गुण जरी घेतला तरीही ती शिवरायाच्या जयंती निमित्त त्यांना विनम्र अभिवादनच असेल
जय शिवराय
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा