इंग्रजांनी भारताची फाळणी जाती नुसार करण्याचा भरपूर प्रयत्न केला. परिणाम भारत पाकिस्तान फाळणी होण्यास कारक ठरली.
पण जेव्हा भारत एकसंघ राष्ट्र म्हणून उदयास आले, त्यावेळी भारताचे पाहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू झाले. त्यांनी राज्य संघ म्हणजेच कुठलेही राज्य न निर्माण करण्या पेक्षा भारतात भारत एकसंघ निर्माण करण्याचे ठरवले, ज्यामध्ये क्षेत्रानुसारच भारतात फक्त ४ ते ५ राज्य सुरुवातीला होती. पण भारतातील अनेक क्षेत्रातून क्रांती घडवून आली. ही क्रांती होती भाषेवरून. महाराष्ट्र आधी गुजरात, महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश मधील काही भाग मिळून होता. पण येथील जनते मध्ये भाषा व संस्कृती वरून वाद निर्माण झाला. त्यावेळेस या तीनही राज्यांना सौराष्ट्र म्हटले जाई. आणि या राज्याचे मुख्यमंत्री होते मोरारजी देसाई. त्यावेळेस काँग्रेस पक्ष भारतातील सर्वात मोठा पक्ष होता. त्यामुळे अनेक मोठे नेते या पक्षात काम करत होते. ज्यामध्ये यशवंतराव चव्हाण पण होते. आणि महत्वाचे निर्णय हे पक्षातील मोठे नेते घेत.
जनतेतील भाषा व संस्कृती वरून राज्य निर्मितीची क्रांती बघितल्यावर शेवटी या तीनही राज्यांना स्वतंत्र निर्माण करण्यात आले. पण मुंबई मूळ महाराष्ट्राची असूनही तिला गुजरात मध्ये शामिल करण्याचा निर्णय झाला. यातुन महाराष्ट्र व गुजरात या दोनही राज्यात तणाव निर्माण झाला. मुंबई यासाठी एक सभा झाली ज्यात मोरारजी देसाई यांनी मुबंई केंद्र शासीत प्रदेश बनवण्याचा निर्णय घेतला. या निर्णया दरम्यान ते म्हणाले की मुबंई महाराष्ट्राला केव्हाही मिळणार नाही. ज्याला महाराष्ट्र मुंबईतील मराठी भाषिकांनी विरोध केला. व मुंबईत एक आंदोलन झाले. ज्यावर मोरारजी देसाई यांनी पोलिसांकडून गोळीबार केला. ज्यात १०५ मराठी भाषिकानी बलिदान दिले.
यशवंतराव चव्हाण यांना हे सर्व भघितल्यावर वाईट वाटले ,पण पक्षा विरोधात जाऊन काहीही मिळणारं नाही लक्षात आल्यावर त्यांनी एक शक्कल लढवली. नेहरूंना महाराष्ट्रात बोलावले.आणि एका भाषणात ते म्हणाले की नेहरु व संयुक्त महाराष्ट्रात ,मला नेहरु महत्त्वाचे वाटतात असे ते म्हटले. यशवंतराव चव्हाण यांच्या या वाक्याने नेहरूंना खुश केले. पण तरीही मुबंई महाराष्ट्रात देण्यास ते तयार नव्हते. शेवटी निवडणूक घेण्याचा निर्णय झाला. ज्यात महाराष्ट्राच्या बाजूने खुप मत आली. काँग्रेस पक्ष तसाही हळू हळू ढासळत चालला होता ,भविष्यात या जनतेच्या मताना नजर अंदाज करून चालणार नाही,असा विचार करून मुंबई महाराष्ट्र आली.
मुबंई महाराष्ट्र येण्यासाठी मराठी भाषिकांनी व यशवंतराव चव्हाण यांनी खुप लढा दिला.
१ मे १९६० रोजी महाराष्ट्र संयुक्त रित्या स्थापन करण्यात आला. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना करण्यात आले. मुंबईला महाराष्ट्राची राजधानी करण्यात आले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा