छत्रपती शिवरायांच्या अदिलशाही विरुद्ध चाललेल्या कार्यवाही बघितल्यावर शिवरायांनी ज्यावेळी चाकण घेतला. त्याशेजारीच असलेले अदिलशाहीचे शिरवळचे ठाणे या ठिकाणी असलेल्या अमिनाने अदिलशाही मध्ये शिवराया विरुद्ध तक्राळ केली. त्यांनतर अमिनाच्या तक्रारीने व दरबारातील शिवरायांच्या विरुद्ध कानपिचक्या ऐकल्यावर नशेत धुंद अदिलशाहा काहीसा जागा झाला. त्याने ताबडतोब शिवरायांचा बंदोबस्त करण्यासाठी फत्तेखानाला पाठवले.
ही खबर जेव्हा शिवरायांना समजली, त्यावेळी शिवराय काहीसे हर्ष भरीत झाले. पण दरबारातील जिजाऊ महासाहेब,बाजी पासलकर ,तानाजी सर्व अचर्यचकीत झाले. जिजाऊंनी विचारल्यावर शिवराय म्हणाले की "आम्ही विचार केला त्यापेक्षा अदिलशाही काहीशी उशिरा जागी झाली. मुळात खर पाहिलेतर हे आपल्याला संकट नाही तर संधीचं आहे. कसे काय या विषयी बाजी पासलकर यांनी शिवरायांना विचारल्यावर शिवराय म्हणले "सर्वात आधी आपण फत्तेखानाला अडवू बाकी आई भवानी बळ देईलच.
ठरल्या प्रमाणे शिवारायनी चाकण किल्यावर आले. तो पर्यंत फत्तेखान खळत- बेलसरला तळ देऊन बसला होता. शिवराय चाकणला आल्याचे समजताच खानाने आपला प्रमुख सरदार बाळाजी हैबताला शिवरायावर पाठवले. बाळाजी हैबत अधीक कुमक मिळवण्यासाठी अदिलशाहीचा शिरवळचा गड सुभान मंगल यावर पोहोचला.
शिवरायांना ही बातमी समजताच बाळाजी हैबत व सुभानमंगळ जागा होण्याच्या आत त्यांनी बाजी पासलकर यांना अमावसेच्या रात्रीच सुभानमंगळ गड घ्यायचे ठरवले. बाजी पासलकर हर्ष भरीत झाले. रात्रीच बाजी पासलकर फौजघेऊन सुभानमंगळ गडाखाली आले. गनिमी कावा वापरत गडाच्या दरवाज्याच्या भिंतीना खिंडार पडण्यास सुरुवात झाली. गडावर लक्षात येई पर्यंत अर्धी भिंत पोखरून झाली होती.
गडावरील गडकरी आणि बाळाजी हैबत जागे झाले. गडकरीला काही कळेनाच, काही सुचून देण्याचा आत बाजी पासळकरांनी दरवाजा फोडला. अमावास्याची रात्र असल्याने गडातील सैनिकांना बाजी पासलकरांची फौज दिसेनात. बाजी पासळकरांनी शर्यत लावून गडकऱ्याला आणि बाळाजी हैबतच्या मुसक्या आवळल्या. गड रात्री काही कालावधी बाजी पासलकरांचा ताब्यात आला.
क्रमशः...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा