छत्रपती शिवरायांनी आपल्या सरदारांना आणि मावळ्यांना मातृभूमी विषयी एवढं जागृत केलं होतं की दुष्मन कितीही मोठा असोत पण त्याचा सामना करायचाच. त्यामुळेच बाजी पासळकरांनी दोन मोठे विरोधक सुभानमंगळ गडावर असूनही त्यांचा सामना केला.
शिवरायांना गड ताब्यात आल्याची वर्दी बाजीनी दिली. गड फत्ते झाल्याचे समजतात. शिवरायांना खुप आनंद झाला. पण जेव्हा ही बातमी आधीलशाहाने पाठवलेल्या फत्तेखानाला समजली तो चवताळून उठला. त्याने सरळ चाकण वर चढाई करायचे ठरवले.
इकडे बाजी पासळकरांनी सुभानमंगळ गडातून मोठी लूट मिळविली. घोडे आणि दारुगोळा मोठया प्रमाणात मिळाल्यावर ती सर्व कुमक घेऊन शिवरायांनी बाजींना चाकण ला बोलावले. आदिलशाहीचा दारुगोळा अदिलशाही वर वापरायचा असे शिवरायांनी ठरवले.
फक्त मोठ्या फौजेच्या भरोश्यावर आलेला फत्तेखान शिवरायांच्या योजनेला समजू शकला नाही त्याने सरळ किल्यावर हल्ला चढवला. शिवरायांनी सर्वात आधी खानाला तोफांच्या गोळ्यांच्या सीमेत आणले, व त्यानंतर बेसावध खानावर गोळे डागण्यास सुरुवात केली. तोफेच्या गोळ्यांच्या तडाख्यातून सावध होण्याच्या आत किल्ल्यातून हर हर महादेव म्हणत शिवरायांची फौज तुटून पडली.
शिवरायांनी सर्वात आधी खानच्या फौजेच्या सेनापतीला फडशा पडण्यास तानाजीला संगितले. ठरल्या प्रमाणे सर्वांनी आधी खानचा सेनापती व सर्व मत्वाचे अधिकारी पडले. सेनापती पडलेला दिसताच खानाचे सैनिक व स्वतः खान पळ काढण्यास सुरुवात झाली.
बाजी पालकरांनी पळून चाललेल्या खानाचा पाठलाग केला. व फत्तेखान्याच्या मुसक्या आवळल्या. पण यामध्ये वयोवृद्ध बाजी पासलकर जखमी झाले. शिवरायांना जेव्हा समजले तेव्हा ते ताबडतोब बाजींना सामोरे गेले. आणि बाजींना म्हणाले की बाजी काका खानाच्या मुसक्या अवळण्या पेक्षा तुम्ही स्वराज्यासाठी अधिक मोलाचे आहे. हे ऐकल्यावर बाजींच्या डोळ्यात अश्रू आले. आणि हे बघितल्यावर शिवरायांनी बाजींना मिठी मारली.
शिवरायांनी संकटातही संधी शोधण्याचा प्रयन्त केला. हे या युद्धातून लक्षात येते. येथे शिवरायांनी दोन महत्वाचे फायदे मिळवले एक म्हणजे फत्तेखाना बरोबर झालेल्या युद्धात घोडे व दारुगोळा शिवाय सुभानमंगळ हा गड ही सर केला. तर दुसरे म्हणजे अदिलशाहीच्या दरबारात शिवरायांनी आपला दरारा निर्माण केला.
मित्रांनो आपल्याही जीवनात अनेक संकटे येतात जर त्यामध्ये शिवरायाप्रमाणे संकटात संधी शोधली तर यश फार दूर नाही.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा