छत्रपती शिवरायांनी ज्या प्रमाणे दक्षिण भारतात हिंदू समाजा साठी स्वराज्य निर्माण केले. त्याच प्रमाणे आपणही उत्तर भारतात हिंदू समाजा साठी स्वराज्य निर्माण करू शकतो असे विचार करणारे बुंदेल खंडचे महाराज छत्रसाल बुंदेले.
महाराज छत्रसाल यांचा जन्म ४ एप्रिल १६४९ रोजी राजस्थान मधील टिकम गड जिल्यातील ककर कांचनाहे या गावी झाला. चंपतराय बुंदेला हे त्यांचे वडील . छत्रसाल हे १२ वर्षाचे असताना त्यांच्या आई वडिलांचे निधन झाले. आणि त्याच कालावधीत मुघलांनी बुंदेल खंडावर हल्ला चढवला. बुंदेलखंड मुघलांकडे गेल्यावर छत्रसाल यांच्या मोठ्या भावाने मुघलांचे वर्चस्व स्वीकारले. त्यामुळे वयाने लहान असे छत्रसाल यांच्या ताब्यात काहीच राहिले नाही. शेवटी छत्रसाल आणि त्यांचे भाऊ हे सर्व छत्रसाल यांच्या वडिलांचे मित्र जयसिंग यांच्या कडे गेले, व त्यांच्या सेनेत शामिल झाले.
जयसिंग हे औरंगजेबासाठी काम करत होते. जयसिंग यांना ज्या मुघलांकडून जी पण कामगिरी भेटत त्यामध्ये छत्रसाल पण सामील होत.
छत्रसाल बुंदेला यांना १६६५ मध्ये निजमविरुद्ध च्या लढाईत पहिल्यांदा आपल्या शक्तीच प्रदर्शन दाखवल. पण मुघल अधिकारी यांनी छत्रसाल नंतर आपल्या साठी खतरा होऊ शकतो, त्यामुळं स्वतःच्याच तिमक्या मारत औरंगजेबापाशी याउलट छत्रसाल यांच्या विषयी कान भरणी केली. त्यामुळे औरंगजेब त्याच्या सरदारांच्या बाता मध्ये येऊन छत्रसाल याला अपमानित करत काढून दिले.मुघलांसाठी आपण एवढे केले, आणि त्याचे फळ आपल्याला असे मिळाले, या मुळे आपल्या स्वतःचा बुंदेल खंडाला घेणाऱ्या औरंगजेबाचा छत्रसाल याचा राग आला.
याच दरम्यान छत्रपती शिवरायांचे राज्याभिषेक झाला होता. दक्षिणेत एका हिंदू राजान आपलं स्वतःच स्वराज्य निर्माण केलं आहे, हे ऐकल्यावर छत्रसाल यांना शिवरयांच्या सामर्थ्यने प्रेरित झाले. शिवरायांची भेट घेतल्यावर मला पण तुमच्या सेनेत शामिल करा ,असे छत्रसाल छत्रपती शिवरायांना म्हणाले पण याउलट शिवराय छत्रसाल यांना म्हणले की "तुम्ही ही आमच्या प्रमाणे उत्तरेतील हिंदू जनतेला मुघलांच्या तावडीतून मुक्त करा".
शिवरायांच्या सांगण्या प्रमाणे छत्रसाल बुंदेला यांनी मुघलांशी लढा दिला, स्वजन विरोधात होते, तरीही त्यांनी बुंदेलखंडाला मुघलांच्या तावडीतून मुक्त केले. व एक हिंदू राजा म्हणून तेथील करोभार पाहू लागले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा