मित्रांनो आपण जर पाहिले तर अनेक कीर्तीवाण मातानी इतिहासात आपली नावे सुवर्ण अक्षरांनी लिहिलेली आढळून येते. ज्यांनी आपल्या पोटी एका शूरविरास जन्म दिला.
भारत भूमी तर अनेक वीरांनी भरली आहे पण त्यांना घडवण्यासाठी एक माताच होती, हेही आपण लक्षात घ्यायला हवे,
माता कौसल्या यांनी प्रभू राम यांना जन्म दिला आणि आपल्याला एक मर्यादा पुरुषोत्तमाचे चरित्र बघण्यास मिळाले. यावरून माता कैसाल्या यांनी श्री रामाला जी शिकवण दिली असेल, ती श्री रामच्या कीर्ती यावरून लक्षातच येते.
माता देवकी यांनी श्रीकृष्ण रक्षणासाठी जे प्रयन्त केले ते फक्त एक माताच करू शकते, तर माता यशोदेने श्रीकृष्ण यांना ज्या प्रेमाने वाढवले, यातून ऐका प्रेमळ मातेचे जीवापाड प्रेम दिसून येते.
कुंती मातेने पांडवांना धर्माविषयी जागृत केले नसते, तर महाभारतातील धर्मयुद्ध झालेच नसते.
राजमाता जिजाऊंनी छत्रपती शिवरायांना घडवले नसते. शिवरायांनी ज्या ठिकाणी स्वराज्य मिळवले, त्याठिकाणी काय अवस्था असती ते वेगळे सांगायला नको.
सावित्रीबाई फुले, झाशीची राणी, अहिल्याबाई होळकर अशा अनेक माता आणि कीर्तीवाण स्त्रिया भारत भूमीत होऊन गेल्या.
माता रखमाबाई आणि वडील विट्टल यांनी तर निवृत्तीनाथ ज्ञाना, सोपान, मुक्ताबाई यांच्यासाठी जीव त्यागला होता.
पण आता येतून पुढे काय, टीव्ही वरील विचित्र मालिका बघणाऱ्या आताच्या माता, मुल त्रास देऊ नये म्हणून हातात मोबाईल देणाऱ्या आत्ताच्या माता कशा आत्ता महासत्ता बनणाऱ्या भारताला वीर देऊ शकतील हा प्रश्न आपल्या सर्वांवर अवलंबून आहे.
त्यामुळे आवश्यकता आहे भारताला फक्त वीरांची नाही तर वीरांगना व वीर मतांची त्याच फक्त भारताला महासत्ता बनवू शकतील.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा