ने मजसी ने परत मातृभूमीला ।
सागरा, प्राण तळमळला
भारत भूमीच्या स्वातंत्रतेसाठी कोठलीही किंमत मोजू पण स्वातंत्र्याची देवता आम्ही प्रसंन्नच करू ही जिद्दीची असा ठेवणारे विनायक दामोधर सावरकर
स्वतंत्र वीर सावरकर यांचा जन्म २८ मे १८८३ रोजी नाशिक जिल्ह्यातील भगूर यागावी राधाबाई यांच्या पोटी झाला. वडील दामोधर सावरकर यांना एकूण तीन अपत्य त्या पैकी विनायक हे दुसऱ्या क्रमांकाचे. विनायक यांचे वडील हे व्यवसायाने सावकार. विनायक नऊ वर्षाचे होते तेव्हा त्यांच्या आईचे छत्र त्यांच्या पासून हिरावले. मोठया काकूने त्यांचा सभांळ केला. पुढे इंग्रजांच्या अत्याचारमुळे त्यांची सावकिरी गेली. आणि त्यातच प्लेग रोगाच्या साथी मध्ये वडीलही वारले. मोठया काकांना इंग्रजांनी एका आंदोलनात गोळी झाडली, असे अनेक संकटे भघितल्यावर तुळजा माते पुढे शिवराया प्रमाणे प्रण घेतला की शेवटच्या स्वासा पर्यंत इंग्रजां बरोबर संघर्ष करत राहील.
स्वातंत्रवीर सावरकर हे बालपणापासूनच हुशार होते. सावरकर हे छत्रपती शिवराय यांच्याकडून प्रेरित होते. काळ्या पाण्याची शिक्षा दिल्यावर इंग्लड मधून पळताना त्यांनी शिवरयांच्या आग्रा मधून पाळण्याच्या योजनेचाच वापर केला होता. यासाठी त्यांनी सर्व योजनाही बनवली होती.
आज जे स्वातंत्र्य आपण बगतोय त्यात या भारतीय वीरांचा मोलाचा वाटा आहे हे आपण विसरता कामा नये. शिक्षा भोगन्यासाठी सावरकर अंदमान निकोबरला गेले होते. तेव्हा किती अत्याचार झेलला होता. या विषयी वाचल्यावर अंगावर काटाच येतो.
सावरकरांनी भारत भूमी साठी केलेले कार्य युवा पिढी साठी सतत प्रेरणादायी असेल.
स्वातंत्रवीर विनायक दामोधर सावरकर यांच्या जयंती निमित्त त्यांना विनम्र अभिवादन.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा