जावळी काबीज झाली. 15 जानेवारी 1656 या दिवशी महाराज जातीनिशी जावळीत आले. शंभू महादेवाची... महाबळेश्वराची जावळी स्वराज्यात सामील झाली. या युद्धात चंद्ररावांकडून लढणारा एक योद्धा महाराजांनी स्वराज्यात सामील केला - मुरारबाजी देशपांडे, तुम्हांमध्ये पुरुषार्थ असला, तर उदईक येत असाल तर आजच या!" जावळीच्या घनदाट जंगलात राज्य करणार्या चंद्रराव मोर्यांनी छत्रपति शिवाजी महाराजांना डिवचलं. महाबळेश्वर, मकरंदगड आणि पारघाटाच्या डोंगरांच्या दाटीत चंद्रराव मोर्यांची जावळी वसली होती. जावळीच्या जंगलात राज्य करायला वाघाचेच काळीज हवे आणि मोऱ्यांचे काळीज खरोखर वाघाचेच होते. म्हणूनच मोरे जावळीत पिढ्यान्पिढ्या दौलत थाटून बसले होते. मोरे आदिलशहांचे मांडलिक सरदार होते. 'चंद्रराव' हा मोऱ्यांचा पिढीजात किताब होता. आदिलशहाची अवकृपा झाली आणि मोऱ्यांची दौलत जप्त करण्याचा हुकूम सुटला, पण छत्रपति शिवाजी महाराजांच्या पाठबळामुळे यशवंतराव मोरे 'चंद्रराव' झाले. चंद्रराव आपला भाऊबंद प्रतापराव मोरे व कारभारी हणमंतराव मोऱ्यांसवे जावळीचा कारभार पाहू लागले. काही चुगलखोर चंद्रराव व हणमंतरावांच्या कानाला ला...
गणरायाचे विवेकबुद्धी व शांतपण हे अतुलनीय गुण अगोदर च्या भागात गणरायाच्या चातुर्य या गुणाचा मागोवा घेतला या भागात आपण विवेक बुद्धी व शांतपणा या गुणांचा मागोवा घेऊ - विवेक बुद्धी या गुणांचा आपल्या जीवनात असामान्य महत्व आहे .आपली बुद्धी विवेकी स्थिर ,व परस्थितीनुसार निर्णय करणारी असेल तर येणाऱ्या कोणत्याही संकटाचा सामना करू शकतो. क्रोध नियंत्रित करू शकतो हे पुढील कथेवरून लक्षातच येईल- ती कथा आपल्या सर्वानाच माहित आहे .जेव्हा देवानं वादविवाद सुरु झाला, कि प्रथम पूजनाचा मान कोन्हाला याचे उत्तर म्हणून ब्रम्हदेवाने स्पर्धा आयोजित केली, कि जो कोण्ही संपूर्ण ब्रम्हांडाला चक्कर मारिल तो विजयी . मातापार्वतीनी गणराया व कार्तिकेय या दोघांना या स्पर्धेत भाग घेण्यास सांगितल. या ठिकाणी गणरायाचे वाहन मूषक होते तरीही गणरायाने भाग घेतला. जेव्हा स्पर्धा सुरु झाली तेव्हा गणराया सर्वात मागे होते .तरीही गणरायाने योग्य निर्णय घेत आपले मातापिता यांना चक्कर मारला .जेव्हा याचे कारण गणरायाला विचारले तेव्हा गणरायाणे सांगितले कि जर मातापित्यातच जर सम्पूर्ण ब...