मुख्य सामग्रीवर वगळा

शिव दिनविशेष २६ फेब्रुवारी १६४७

 २६ फेब्रुवारी १६४७ : थोरले महाराज फर्जंद "शहाजीराजे भोसले" यांनी शिवाजी महाराजांची पाठवणी बंगळूरहून पुणे जहागिरीकडे केली. या ऐतिहासिक घटनेने मराठा साम्राज्याच्या विस्तारास प्रारंभ केला. शहाजी राजेंच्या मार्गदर्शनात शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्याची नींव रचली. हा दिवस इतिहासात एक महत्वाचा टप्पा आहे, जो महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि राजकीय वारशात अमर राहील. या घटनेतून एक गोष्ट स्पष्ट होते: शक्ती, धाडस, आणि आत्मविश्वास यांचे प्रतीक असलेले शिवाजी महाराज भारतीय इतिहासातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व बनले.

या योजनेने सरनोबत प्रतापराव यांनी बहलोलखानास परास्त केले


 

      छत्रपती  शिवरायांच्या शूर वीरांच्या तिजोरीत अनेक कल्पक ,धीर जिद्दी सरदार होते जे छत्रपती कडून एखादी कामगिरी मिळाल्यावर उसंत घेत नव्हते .

     छत्रपतींचा राज्याभिषेक काही दिवसांवर येऊन ठेपला होता. आणि त्याच मुळे आदिलशाही आणि मुघलशाही एकत्र येणे लाजमी आणि शिवरायांचा प्रताप दाखवण्यास पुरेसे आहे. त्याच मुळे निजामाने बहलोलखानास १२ हजाराच्या फौजेसह छत्रपतीवर चालून जाण्यास सांगितले .ही खबर जेव्हा शिवरायांना कळली .तेव्हा त्यांनी ताबडतोब सरनोबत प्रतापरावांची भेट घेतली. खान उंबरणीत आपला तळ ठोकून बसला होता. आणि मुघलांकडून येणाऱ्या फौजेची वाट पाहत बसला होता. शिवरायांना ही नामी संधी वाटली .आणि प्रतापरावाणी शिवरायांच्या मनातील ही गोष्ट हेरली.

 दुष्मन खाऊ द्यायच बलाढ्य होऊ द्यायच इतका वेळ दिल्यावर अंगावर घ्यायचं हे शिवरायांचे तत्व मुताळतच नव्हते .अंगावर येणारच आहे ,तर त्या आधीच दुष्मन ठेचायचा म्हणजे समोरच्याला पुढील हमला करता धाक पडायला हवा .

      छत्रपती शिवरायांचा आदेश मिळताच प्रतापरावयांनी  खान जेथे तळ ठोकून बसला होता .त्या पूर्ण प्रदेशालाच रात्रीचे मराठ्यांनी वेढा घातला. खान विचार करूनच उंबरणीत थांबला होता ,कारण उंबरणी पासून मुघल जवळ होते ,शिवाय निजामाची कुमक हळूहळू येतच होती. शिवाय हा परिसर हिरवळ होता ,जागा बघून खानाने नदी  जवळच आपला तळ टाकला होता .हीच गोष्ट प्रतापरावाणी हेरली काही सैनिक नदी पात्रा लगत घात देऊन बसले. सकाळी जेव्हा खानाचे माणसे उठली तेव्हा रानडुकराला चारही बाजूने वाघाने गेरल्यावर जसा मृत्यू समोर दिसतो तसा मृत्यू खानास दिसू लागला .

     प्रतापराव या ठिकाणी गनिमी कावा कशाला सोडणार खानाला चारही बाजूने घेतल्यावर प्रतापराव घिधडा सारखे खानाचे लचके घेत होते .

      खानाला प्रतापरावांचा स्वभाव महित होता. केविलवाने शाब्दिक पत्र लिहून आपल्या वकीलासह त्याने प्रतापराव यांकडे पाठवले." आम्हाला क्षमा करावी आपण थोर आदिल शाईच्या मर्जीने आम्ही येथवर आलो यात आमचा काही दोष नाही आम्हाला जाऊ द्यावे".

    भावनिक असणारे प्रतपरावांचे मन पत्र वाचून विरघळते आणि त्यांनी बहलोल खानास सोडून दिले.

        या पुढील भागात छत्रपती शिवराय बहलोल खानास सोडल्यामुळे प्रतापरावावर का रागावले याविषयी क्रमशः.....

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिव तेज दिन ।शिवरायांचे आठवावे ते रूप शिवरायांचा आठवावा तो प्रताप

    भारतात   काही नापाक आतंकवादयानी घुसून हल्ला केला, ज्यामध्ये भारताचे 20 जवान शहीद झाले, पण जे आतंकवादी भारत भूमी मध्ये घुसले होते, त्यांना मात्र कंठस्नान घालण्यात आले .     एक महिन्यानंतर भारताने या हमल्याचा बदला पाकिस्तान मधील आतंकवादी लॉन्चपँड वर सर्जिकल स्राईक करून घेतला ,एवढं काय अमेरिकेनेही अनेक वेळा सर्जिकल स्राईक केलं आहे.      पण ही संकल्पना आली कोठून ? तर याचा पहिला संदर्भ सापडतो ,तो म्हणजे छत्रपती शिवरायांनी शाईस्तेखाना वर केलेली कारवाई ज्याला आपण छापा युद्ध सुद्धा म्हणतो, ८० हजार फौज घेऊन आलेला शाहिस्तेखान मामा तीन बोटे तोडून कसा पसार झाला ,हा इतिहास आपण सर्वच जाणतो .      शिवरायांचा असा समृद्ध इतिहास महाराष्ट्रा सह संपूर्ण भारतभूमीला लाभला आहे .पण तो वारसा आपण जपतो का आपल्या नवीन येणाऱ्या पिढीला सांगतो का या वरून लक्षात येते.       शिवरायांचा इतिहास आपण लक्षात फक्त आपली सांस्कृतिक धन आहे, पुरोगामी इतिहास आहे, म्हणून लक्षात ठेवण्या पेक्षा शिवरायांनी वापरलेल्या योजना कौशल्य आत्मसात करून आजच्या ही कालावधीत...

दृष्टा विरुद्ध लढणाऱ्या दुर्गा मातेकडून घ्या हे पाच मौल्यवान गुण

            महिषासुराने तप करून देवांकडून अजय होण्याचे वर मागितले व ते देवांना नाईलाजाने द्यावे लागले.   त्यांना माहीत होतं,की हा राक्षस त्याच्या शक्तीचा गैरवापर नक्की करेल.आणि तसेच झाले महिषासुराने देवलोकला जिंकून घेतले यानंतर महिषासुराचा वध करण्यासाठी इंद्राने माता पार्वतीची आराधना केली.प्रसन्न होऊन मातेने इंद्राला महिषासुराचा वध करण्याचे आश्वासन दिले.आणि यानंतर दुर्गा अवतार घेऊन मातेने नऊ दिवसामध्ये असुरांचा वध केला,यामधून आपण अनेक गोष्टी शिकू शकतो,त्यातील काही पुढल प्रमाणे- १.अंतरंगातील वाईट (राक्षसी) विचारांचा वध          दुर्गा मातेने राक्षसांशी जे युद्ध केले.त्यातून पहिला हाच संदेश मिळतो,की जसे माता दुर्गाने राक्षसांचा वध केला तसेच आपल्या अंतरंगातील काम, वासना,क्रोध लोभ यासारखे अनेक राक्षस असतात.भक्ती नामक शक्ती निर्माण करून आपण वाईट विचारांचा वध करू शकतो.   २.अशक्य गोष्टीस योजना_          महिषासुराला अजय होण्याचे वर होते. तो ज्याच्याशी युद्धाला सिद्ध होत त्याचा पराभव होत ,पण मातेने त्याला...

३ एप्रिल १६८० इतिहासातील एक काळा दिवस ।शिवाजी महाराज पुण्यतिथी दिन

      इतिहासात अनेक वीर योद्धे राजे महाराजे होऊन गेले आणि काळाच्या काळ्या दरीत समाहून पण गेले .पण इतिहासाने असेही काही योद्धे बघितले आहे जे इतिहासात अजर अजरामर तर झालेच, आणि भविष्यात त्यांचा जेव्हा उल्लेख होईल तेव्हा शरीरावर क्षहारे उभे राहिल्या शिवाय राहणार नाही       त्या पैकी शिवराय आहे यात काही दुमत नाही हेच खरे, महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारत वर्ष मध्ये नावाजलेले अमर योद्धे छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा स्वर्ग वाशी झाले तेव्हा हिंदू स्वराज्य निर्माण करणारा भारताचा खरा वीर इहलोक सोडून गेले याचा संपूर्ण भारत वर्षाला दुःख होते.     शिवराय जेव्हा मृत्यू च्या दारात होते तेव्हाही त्यांना स्वराज्य आणि सामान्य जनतेचीच काळजी होती. संभाजी महाराज नेटकेच मुघलांच्या चंगुळ मधून सुटून आले होते ,शंभूराजे बरोबर शेवटी  खुप बोलावं असही शिवरायांना वाटत होतं.      शिवराय फक्त संसारच करून नाही गेले, तर तुकाराम महाराज रामदास स्वामी च्या सानिध्यात जे परमार्थ रुपी धन तेही जोपासले होते .प्रत्येकाचा मृत्यू अटळ आहे सर्वात श्रेष्ठ तो भगवंत आहे. ब...