मुख्य सामग्रीवर वगळा

शिव दिनविशेष २६ फेब्रुवारी १६४७

 २६ फेब्रुवारी १६४७ : थोरले महाराज फर्जंद "शहाजीराजे भोसले" यांनी शिवाजी महाराजांची पाठवणी बंगळूरहून पुणे जहागिरीकडे केली. या ऐतिहासिक घटनेने मराठा साम्राज्याच्या विस्तारास प्रारंभ केला. शहाजी राजेंच्या मार्गदर्शनात शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्याची नींव रचली. हा दिवस इतिहासात एक महत्वाचा टप्पा आहे, जो महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि राजकीय वारशात अमर राहील. या घटनेतून एक गोष्ट स्पष्ट होते: शक्ती, धाडस, आणि आत्मविश्वास यांचे प्रतीक असलेले शिवाजी महाराज भारतीय इतिहासातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व बनले.

छत्रपती संभाजी महाराज या कारणावरून तरुण असताना मुघलांच्या चंगुळ (बाजूने) गेले होते

 


   छत्रपती शिवरायांचा छावा म्हटले जाणारे वीर संभाजी महाराज ज्यांनी अखेरच्या श्वासा पर्यंत मुघलांशी लढा दिला.  ज्यांच्या शौर्या पुढे औरंगजेब सुद्धा नमला होता. त्या छ .संभाजी महाराजांवर अनेक वेळा   हा आरोप राज्यांचे विरोधक लावत होते , की संभाजी महाराज युवा अवस्थेत असताना मुघलांना जाऊन मिळाले.पण मूळ तथ्य आणि इतिहासकार मात्र वेगळेच सांगतात .
    छत्रपती संभाजी महाराज जेव्हा युवा अवस्थेत होते तेव्हा त्यांचे रक्त सळसळते होते. पण आंतरिक स्वराज्यात शंभू राज्या विरुद्ध मात्र वेगळेच कट शिजत होते.छ संभाजी महाराज जेव्हा नवीन मोहिमेवर निघण्याची तयारी करत तेव्हा अनेक विरोधक ती मोहीम हातातून काढून वेगळ्या किल्ल्यावर फक्त देखरेख करण्यासाठी शिवरायांना सांगून पाठवत. ज्यामुळे संभाजी महाराजांना नवीन काही शिकताच येत नव्हते. त्यामुळे अनेक वेळा त्यांचे शांत मन अस्थिर व्हायचे .
   एकदा छत्रपती संभाजी महाराज मुघलांच्याच शेजारी असलेल्या काही किल्यांची देखरेख करत होते. शेजारी मुघलांच्या किल्लेदार महाबत खान  होता .जेव्हा त्याला ही गुप्त माहिती कळली की संभाजी महाराज शेजारील काही किल्याना भेट देत आहे व स्वराज्यात संभाजी महाराजा विरुद्ध जे कट शिजत होते. याचा गैर वापर करून खानाने संभाजी महाराजाना एक पत्र लिहिले ज्यामध्ये त्यांचा स्वराज्यात चाललेला अपमाना बद्दल उल्लेख करून मुघल आजही आपली वाट बघत आहे, असे लिहिले संभाजी महाराजांना  खानाचा डाव लागोलाग समजला पण शत्रू आतून किती मजबूत आहे हे समजून घेण्यासाठी शंभू राजे खानाला भेटायला गेले. खानाने सुरूवातीला शंभू राज्यांचा आदर सत्कार केला, पण जेव्हा शंभूराजे खानाची भेट घेवून निघाले तर खानाने शंभूराजे ना किल्ल्यातच म्हणजे न कैद खान्यात टाकत फक्त किल्ल्यात धरून ठेवले आणि स्वराज्यात ही चुकीची माहिती फिरवली की संभाजी महाराज मुघलांना येऊन मिळाले.
     आणि या बातमीला हवा देण्याचे काम केले शंभू राज्यांच्या विरोधकांनी. पण एवढे असूनही चार ते पाच वर्ष मुघलां कडे राहून मुघलांच्या अनेक अंतरीक बाबी शंभू राज्यांच्या लक्षात आल्या आणि याचाच वापर त्यांनी औरंगजेब जेव्हा चालून आला त्यावेळेस त्यालाअडवण्यासाठी केला .
    त्यामुळे असे म्हणणे अयोग्य ठरेल की संभाजी राजे मुघलांच्या चंगुळ मध्ये अडकलेले होते या उलट असे म्हणणे योग्य ठरेल की त्या कैदेच्या कालावधीत मुगलच शंभू राजेंच्या चंगुळ मध्ये अडकले होते.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिव दिनविशेष २६ फेब्रुवारी १६४७

 २६ फेब्रुवारी १६४७ : थोरले महाराज फर्जंद "शहाजीराजे भोसले" यांनी शिवाजी महाराजांची पाठवणी बंगळूरहून पुणे जहागिरीकडे केली. या ऐतिहासिक घटनेने मराठा साम्राज्याच्या विस्तारास प्रारंभ केला. शहाजी राजेंच्या मार्गदर्शनात शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्याची नींव रचली. हा दिवस इतिहासात एक महत्वाचा टप्पा आहे, जो महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि राजकीय वारशात अमर राहील. या घटनेतून एक गोष्ट स्पष्ट होते: शक्ती, धाडस, आणि आत्मविश्वास यांचे प्रतीक असलेले शिवाजी महाराज भारतीय इतिहासातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व बनले.

शिव तेज दिन ।शिवरायांचे आठवावे ते रूप शिवरायांचा आठवावा तो प्रताप

    भारतात   काही नापाक आतंकवादयानी घुसून हल्ला केला, ज्यामध्ये भारताचे 20 जवान शहीद झाले, पण जे आतंकवादी भारत भूमी मध्ये घुसले होते, त्यांना मात्र कंठस्नान घालण्यात आले .     एक महिन्यानंतर भारताने या हमल्याचा बदला पाकिस्तान मधील आतंकवादी लॉन्चपँड वर सर्जिकल स्राईक करून घेतला ,एवढं काय अमेरिकेनेही अनेक वेळा सर्जिकल स्राईक केलं आहे.      पण ही संकल्पना आली कोठून ? तर याचा पहिला संदर्भ सापडतो ,तो म्हणजे छत्रपती शिवरायांनी शाईस्तेखाना वर केलेली कारवाई ज्याला आपण छापा युद्ध सुद्धा म्हणतो, ८० हजार फौज घेऊन आलेला शाहिस्तेखान मामा तीन बोटे तोडून कसा पसार झाला ,हा इतिहास आपण सर्वच जाणतो .      शिवरायांचा असा समृद्ध इतिहास महाराष्ट्रा सह संपूर्ण भारतभूमीला लाभला आहे .पण तो वारसा आपण जपतो का आपल्या नवीन येणाऱ्या पिढीला सांगतो का या वरून लक्षात येते.       शिवरायांचा इतिहास आपण लक्षात फक्त आपली सांस्कृतिक धन आहे, पुरोगामी इतिहास आहे, म्हणून लक्षात ठेवण्या पेक्षा शिवरायांनी वापरलेल्या योजना कौशल्य आत्मसात करून आजच्या ही कालावधीत...

१५ जानेवारी इ.स.१६५६ छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळीवर छापा घालुन जावळी काबीज केली.

  जावळी काबीज झाली. 15 जानेवारी 1656 या दिवशी महाराज जातीनिशी जावळीत आले. शंभू महादेवाची... महाबळेश्वराची जावळी स्वराज्यात सामील झाली. या युद्धात चंद्ररावांकडून लढणारा एक योद्धा महाराजांनी स्वराज्यात सामील केला - मुरारबाजी देशपांडे, तुम्हांमध्ये पुरुषार्थ असला, तर उदईक येत असाल तर आजच या!" जावळीच्या घनदाट जंगलात राज्य करणार्या चंद्रराव मोर्यांनी छत्रपति शिवाजी महाराजांना डिवचलं. महाबळेश्वर, मकरंदगड आणि पारघाटाच्या डोंगरांच्या दाटीत चंद्रराव मोर्यांची जावळी वसली होती. जावळीच्या जंगलात राज्य करायला वाघाचेच काळीज हवे आणि मोऱ्यांचे काळीज खरोखर वाघाचेच होते. म्हणूनच मोरे जावळीत पिढ्यान्पिढ्या दौलत थाटून बसले होते. मोरे आदिलशहांचे मांडलिक सरदार होते. 'चंद्रराव' हा मोऱ्यांचा पिढीजात किताब होता. आदिलशहाची अवकृपा झाली आणि मोऱ्यांची दौलत जप्त करण्याचा हुकूम सुटला, पण छत्रपति शिवाजी महाराजांच्या पाठबळामुळे यशवंतराव मोरे 'चंद्रराव' झाले. चंद्रराव आपला भाऊबंद प्रतापराव मोरे व कारभारी हणमंतराव मोऱ्यांसवे जावळीचा कारभार पाहू लागले. काही चुगलखोर चंद्रराव व हणमंतरावांच्या कानाला ला...