मुख्य सामग्रीवर वगळा

शिव दिनविशेष २६ फेब्रुवारी १६४७

 २६ फेब्रुवारी १६४७ : थोरले महाराज फर्जंद "शहाजीराजे भोसले" यांनी शिवाजी महाराजांची पाठवणी बंगळूरहून पुणे जहागिरीकडे केली. या ऐतिहासिक घटनेने मराठा साम्राज्याच्या विस्तारास प्रारंभ केला. शहाजी राजेंच्या मार्गदर्शनात शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्याची नींव रचली. हा दिवस इतिहासात एक महत्वाचा टप्पा आहे, जो महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि राजकीय वारशात अमर राहील. या घटनेतून एक गोष्ट स्पष्ट होते: शक्ती, धाडस, आणि आत्मविश्वास यांचे प्रतीक असलेले शिवाजी महाराज भारतीय इतिहासातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व बनले.

शिव तेज दिन ।शिवरायांचे आठवावे ते रूप शिवरायांचा आठवावा तो प्रताप




    भारतात  काही नापाक आतंकवादयानी घुसून हल्ला केला, ज्यामध्ये भारताचे 20 जवान शहीद झाले, पण जे आतंकवादी भारत भूमी मध्ये घुसले होते, त्यांना मात्र कंठस्नान घालण्यात आले .

    एक महिन्यानंतर भारताने या हमल्याचा बदला पाकिस्तान मधील आतंकवादी लॉन्चपँड वर सर्जिकल स्राईक करून घेतला ,एवढं काय अमेरिकेनेही अनेक वेळा सर्जिकल स्राईक केलं आहे.

     पण ही संकल्पना आली कोठून ? तर याचा पहिला संदर्भ सापडतो ,तो म्हणजे छत्रपती शिवरायांनी शाईस्तेखाना वर केलेली कारवाई ज्याला आपण छापा युद्ध सुद्धा म्हणतो, ८० हजार फौज घेऊन आलेला शाहिस्तेखान मामा तीन बोटे तोडून कसा पसार झाला ,हा इतिहास आपण सर्वच जाणतो .

     शिवरायांचा असा समृद्ध इतिहास महाराष्ट्रा सह संपूर्ण भारतभूमीला लाभला आहे .पण तो वारसा आपण जपतो का आपल्या नवीन येणाऱ्या पिढीला सांगतो का या वरून लक्षात येते.

      शिवरायांचा इतिहास आपण लक्षात फक्त आपली सांस्कृतिक धन आहे, पुरोगामी इतिहास आहे, म्हणून लक्षात ठेवण्या पेक्षा शिवरायांनी वापरलेल्या योजना कौशल्य आत्मसात करून आजच्या ही कालावधीत आपण विजय( success) मिळवू शकतो. हे समजून घेणे आवश्यक आहे.

    जगात असे अनेक देश आहे जेथे शिवरायांचा इतिहास शिकवला व समजून घेतला जातो .अमेरिकेत लष्कर विभागात सेनेला युध्दाविषयी प्रशिक्षण देताना शिवरायांचा गनिमी कावा शिकवला जातो.

       आवश्यक आहे आपल्या देशानेही शिवरायांचा इतिहास नवीन पिढीला समजेल यासाठी इतिहासाच्या पुस्तकासह प्रत्यक घरात शिवरायांच्या प्रतापाविषयी गुणगान गायले गेले हवे.

     शिवतेज दीना निमित्त सर्वाना सुभेच्छा

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दृष्टा विरुद्ध लढणाऱ्या दुर्गा मातेकडून घ्या हे पाच मौल्यवान गुण

            महिषासुराने तप करून देवांकडून अजय होण्याचे वर मागितले व ते देवांना नाईलाजाने द्यावे लागले.   त्यांना माहीत होतं,की हा राक्षस त्याच्या शक्तीचा गैरवापर नक्की करेल.आणि तसेच झाले महिषासुराने देवलोकला जिंकून घेतले यानंतर महिषासुराचा वध करण्यासाठी इंद्राने माता पार्वतीची आराधना केली.प्रसन्न होऊन मातेने इंद्राला महिषासुराचा वध करण्याचे आश्वासन दिले.आणि यानंतर दुर्गा अवतार घेऊन मातेने नऊ दिवसामध्ये असुरांचा वध केला,यामधून आपण अनेक गोष्टी शिकू शकतो,त्यातील काही पुढल प्रमाणे- १.अंतरंगातील वाईट (राक्षसी) विचारांचा वध          दुर्गा मातेने राक्षसांशी जे युद्ध केले.त्यातून पहिला हाच संदेश मिळतो,की जसे माता दुर्गाने राक्षसांचा वध केला तसेच आपल्या अंतरंगातील काम, वासना,क्रोध लोभ यासारखे अनेक राक्षस असतात.भक्ती नामक शक्ती निर्माण करून आपण वाईट विचारांचा वध करू शकतो.   २.अशक्य गोष्टीस योजना_          महिषासुराला अजय होण्याचे वर होते. तो ज्याच्याशी युद्धाला सिद्ध होत त्याचा पराभव होत ,पण मातेने त्याला...

समर्थ रामदासस्वामीचे छत्रपती शिवरायांना व समाजाला मौल्यवान उपदेश

  यज्ञ तो देव जाणावा,   किंवा, वाळूचे कण रगडीता तेलही गळे,     असे संसारात न राहूनही समाजाला मौल्यवान उपदेश देणारे रामदास स्वामी, भक्ती ,धेर्य आणि हिम्मत या बळावर आपण कोणतेही लक्ष्य साध्य करू शकतो. समर्थ रामदासस्वामीनी जगप्रसिध्द ग्रंथ दासबोध मध्ये तर अनेक तात्विक विचारणा मांडले आहे. हे वरील काही उपदेशावरून लक्षातच आले असेलच.     जागी सर्व सुखी असा कोण आहे,     विचारी मना तूचि शोधूनि पाहे ,   त्यामुळे कर्तव्य महत्वाचे .जन्म का मिळाला? आपले मूळ कर्तव्य काय? तर समाजहित ,समाजासाठी कार्य ,कर्तव्य केले. तर ते ईश्वराला जाऊन मिळते असे अनेक उपदेश समर्थानी छत्रपती शिवरायांना सह छत्रपती संभाजी महाराजांना ही केले आहे.       समर्थांचा जन्म २४ मार्च १६०८ जालना जिल्यातील जांब या गावी झाला. वडिलांचे नाव सूर्याजी ठोसर तर आईचे नाव रेणुबाई, समर्थ लहानपणापासून खोडकर होते .पण एका निश्चित कालावधी नतंर त्यांच्यात बदल होऊ लागला .एकाच जागी निपचित राहून सम्पूर्ण जगाचा विचार करत, आई रेणुबाईना समर्थांचा हा स्वभाव लग्न झाल्यावर ताळ्यावर येईल, असे वाट...