मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

जानेवारी, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

१५ जानेवारी इ.स.१६५६ छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळीवर छापा घालुन जावळी काबीज केली.

  जावळी काबीज झाली. 15 जानेवारी 1656 या दिवशी महाराज जातीनिशी जावळीत आले. शंभू महादेवाची... महाबळेश्वराची जावळी स्वराज्यात सामील झाली. या युद्धात चंद्ररावांकडून लढणारा एक योद्धा महाराजांनी स्वराज्यात सामील केला - मुरारबाजी देशपांडे, तुम्हांमध्ये पुरुषार्थ असला, तर उदईक येत असाल तर आजच या!" जावळीच्या घनदाट जंगलात राज्य करणार्या चंद्रराव मोर्यांनी छत्रपति शिवाजी महाराजांना डिवचलं. महाबळेश्वर, मकरंदगड आणि पारघाटाच्या डोंगरांच्या दाटीत चंद्रराव मोर्यांची जावळी वसली होती. जावळीच्या जंगलात राज्य करायला वाघाचेच काळीज हवे आणि मोऱ्यांचे काळीज खरोखर वाघाचेच होते. म्हणूनच मोरे जावळीत पिढ्यान्पिढ्या दौलत थाटून बसले होते. मोरे आदिलशहांचे मांडलिक सरदार होते. 'चंद्रराव' हा मोऱ्यांचा पिढीजात किताब होता. आदिलशहाची अवकृपा झाली आणि मोऱ्यांची दौलत जप्त करण्याचा हुकूम सुटला, पण छत्रपति शिवाजी महाराजांच्या पाठबळामुळे यशवंतराव मोरे 'चंद्रराव' झाले. चंद्रराव आपला भाऊबंद प्रतापराव मोरे व कारभारी हणमंतराव मोऱ्यांसवे जावळीचा कारभार पाहू लागले. काही चुगलखोर चंद्रराव व हणमंतरावांच्या कानाला ला...

सुभाषचंद्र बोस यांच्यातील नेतृत्व हा मोलाचा गुण

        सामाजिक कोणत्याही गोष्टीचे नेतृत्व करायचे असेल, तर त्यासाठी धेंर्य लागते. नेतृत्व करणाऱ्या गोष्टी विषयी माहिती नसताना जर आपण आव आणून नेतृत्व केले, तर मोठी सामाजिक हानी होण्याची शक्यता असते. वस्तूत काही गुण माणसाला जन्मतःच असतात, त्यापैकीच सुभाषचंद्र यांच्यात नेतृत्व हा गुण आढळून येतो.इंग्रज गुलामगिरीच्या काळात आपल्या देशाचे नेतृत्व करून आपण आपल्या देशाला स्वतंत्र करू शकतो असा विश्वास सुभाषचंद्र यांना होता.        तसाच विश्वास जर आपल्याला आपल्या नेतृत्व विषयी असेल, आणि त्यामुळे सामाजिक मोठा बदल घडवून येत असेल, तर नक्कीच आपले नाव इतिहासात अजरामर होण्यास जास्त वेळ लागत नाही.       सुभाषचंद्र यांचे धाडस आणि त्याग काही वेगळाच होता. वडिलांच्या सांगण्यावरून जेव्हा त्यांनी कलेक्टरची परीक्षा ८ महिन्यातच उत्तीर्ण करून ही देशाचे नेतृत्व करावे म्हणून ते काँग्रेस मध्ये शामिल झाले. जेव्हा काँग्रेसच्या अध्यक्ष पदासाठी निवडणूक झाली त्यावेळी सुभाषचंद्र बहुमताने निवडून आले. त्यानंतरही जेव्हा प्रांतीय निवडणूक झाली त्यामध्येही देशाचे नागरिकांनी...

एवढया संकटां नंतर झाला होता संभाजी महाराजांचा राज्यभिषेक

        कोणतेही पद आपल्याला प्राप्त करायचे असेल , किंवा मिळत असेल तर त्यासाठी आपली क्षमता दाखवने खुप गरजेचे असते. आपण इतिहासातील अनेक उदाहरणे पाहिले तर राजाने आपली सत्ता आपल्या पुत्रा कडे कोणती ही क्षमता न बघता सोपवली असे आढळून येते. पण संभाजी महाराजांच्या बाबद हे उलट आदळून येते, ज्यावेळी शिवरायांचे देहांत झाले, त्यावेळी संभाजी महाराज मुघलांच्या तावडीतुन सुटून नेटकेच आले होते. परंपरा आणि क्षमते नुसार संभाजी महाराजांचा छत्रपती पदावर अधिकार होता. पण संभाजी महाराजांच्या सावत्र आई सोयराबाईना आपला पुत्र राजाराम महाराज यांना सत्तेवर बसवायचे होते. म्हणजेच संभाजी महाराजांना माघे मुघल तर समोर स्वतःची आई असे शत्रू होऊन बसले होते .(आणि औरंगजेबाला ही संभाजी महाराज छत्रपती होऊ नये असे वाटत होते.)       यामुळेच सोयराबाईनी स्वतःचे सख्खे भाऊ आणि स्वराज्याचे सेनापती हंबीराव मोहिते यांना संभाजी महाराजांना अटक करण्याचा आदेश दिला. पण जेव्हा हंबीरराव संभाजी महाराजा कडे पोहोचले त्यावेळी त्यांनी आपली तलवार संभाजी महाराजांच्या समोर ठेवली म्हणजेच हंबीररावानी स्वराज्याचे छत्रपत...

जिजाऊ महासाहेब स्वराज्याच्या पहिल्या उगमस्थान का ? यामागील पाश्वभूमी

        आपल्या स्वतःवर होणाऱ्या अन्याया विरुद्ध जो आवाज उठवून त्या अन्यायाला मोडून काढतो ,त्याला आपण वीर मानतो. पण दुसऱ्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठतो, त्याला तर आपण महावीरच म्हटले हवे .     ' उदाहरणार्थ जिजाऊ महासाहेब'. जेव्हा पूर्ण भारतावर मुघल, निजाम जेव्हा हिंदूंवर  अन्याय अत्याचार करत होते .त्याच वेळी महाराष्ट्राचा काही भाग असा ही होता, जेथे हिंदूं सुरक्षित होते .त्यापैकीच ऐका ठिकाणचे महाराज लखुजीराव जाधव. लखुजीराव  निजामाचे सरदार होते .पण इतर प्रदेशामध्ये जो अन्याय चालला होता, तो त्यांनी सिंदखेड मध्ये त्यांनी प्रजेला सुखात ठेवले होते, आणि याच वातावरणात जिजाऊंचा जन्म झाला.      लहानपणापासूनच जिजाऊ हुशार होत्या, त्यांनी खुप लवकर राजकारणात लक्ष दिले होते. वडील सरदार असल्यामुळे जिजाऊंना लहानपणापासूनच घोड्यावर बसने, तालावर चालवणे यांचे प्रशिक्षण मिळाले, शिवाय जिजाऊ घर कामातही चपळ होत्या .     जिजाऊ महासाहेब जेव्हा वडीला बरोबर निजामांच्या प्रदेशात जात तेव्हा तेथील प्रजेवरील अन्याय पाहून मात्र जिजाऊंना अत्यंत दुः...