मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

नोव्हेंबर, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

१५ जानेवारी इ.स.१६५६ छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळीवर छापा घालुन जावळी काबीज केली.

  जावळी काबीज झाली. 15 जानेवारी 1656 या दिवशी महाराज जातीनिशी जावळीत आले. शंभू महादेवाची... महाबळेश्वराची जावळी स्वराज्यात सामील झाली. या युद्धात चंद्ररावांकडून लढणारा एक योद्धा महाराजांनी स्वराज्यात सामील केला - मुरारबाजी देशपांडे, तुम्हांमध्ये पुरुषार्थ असला, तर उदईक येत असाल तर आजच या!" जावळीच्या घनदाट जंगलात राज्य करणार्या चंद्रराव मोर्यांनी छत्रपति शिवाजी महाराजांना डिवचलं. महाबळेश्वर, मकरंदगड आणि पारघाटाच्या डोंगरांच्या दाटीत चंद्रराव मोर्यांची जावळी वसली होती. जावळीच्या जंगलात राज्य करायला वाघाचेच काळीज हवे आणि मोऱ्यांचे काळीज खरोखर वाघाचेच होते. म्हणूनच मोरे जावळीत पिढ्यान्पिढ्या दौलत थाटून बसले होते. मोरे आदिलशहांचे मांडलिक सरदार होते. 'चंद्रराव' हा मोऱ्यांचा पिढीजात किताब होता. आदिलशहाची अवकृपा झाली आणि मोऱ्यांची दौलत जप्त करण्याचा हुकूम सुटला, पण छत्रपति शिवाजी महाराजांच्या पाठबळामुळे यशवंतराव मोरे 'चंद्रराव' झाले. चंद्रराव आपला भाऊबंद प्रतापराव मोरे व कारभारी हणमंतराव मोऱ्यांसवे जावळीचा कारभार पाहू लागले. काही चुगलखोर चंद्रराव व हणमंतरावांच्या कानाला ला...

रामराज्य आणि आजचा भारत भाग 2

          मित्रांनो आजच्या या युगात Technology  मुळे सर्व गोष्टी पटकन आपल्याला मिळतात. क्षणार्धात विमानामुळे दूर देशी जाता येते. फोनवर सुद्धा दूर देशी बसलेल्या मित्राशी पटकन बोलता येते .         पण या सर्व गोष्टी मानवाने भोग आणि चंचल मनाला पटकन मिळाव्यात म्हणून केल्या आहेत ,एका बाजूने या गोष्टी बरोबर तर आहे. पण दुसऱ्या बाजूने अनेक वाईट परिणाम पहावे लागत आहे.        रामराज्य म्हणजे त्रेतायुगात रामाचा आदर्श ठेऊन सर्व राहत होते. राम स्वतः मर्यादा पुरुषोत्तम होते. शांतपणा ,विवेक, धेंर्य ,नेतृत्व, युद्धकोशल्य हे गुण रामाचे जसे इंद्रियच होते.         पण आजच्या कलियुग कालावधीत मर्यादा, संयम शांतपणा, विवेक हे गुण तर सोडाच ,पण अनेक मानसिक आजार वाढत आहे. चंचलता, आणि पटकन मिळवण्याच्या लोभात अनेक वाईट काम करण्यास आज माणूस मागे पुढे पाहत नाही ये .         रामराज्यात आजार कमी होते ,लोक शक्तीशाली होते .नाती, नीती आणि पारंपरिक गोष्टीचे पालन करत, लोक सतत कार्यात असत ,धार्मिक गोष्टीना मान देत ...

दिवाळी आणि रामराज्य भाग 1

              सोशियल मीडियाच्या या जगात दूर देशी बसलेला मित्र नक्की जवळ आला आहे. पण जवळची नाती आणि रीत, परंपरा मात्र दूर जात आहे. मुळात दिवाळी साजरी का केली जाते, साजरी करण्याचा खरा अर्थ काय हे पुढील माहिती वरून लक्षात येईलच.              श्री रामांचा १४ वर्षाचा वनवास संपल्याव माता सीता, लक्षुमन, हनुमान सहित अयोध्येत आले, या १४ वर्षाच्या वनवासात श्रीराम व माता सीतेला अनेक कष्ट सोसावे लागले.           (अयोध्या आपले शरीर श्रीराम आपल्या मनातील निश्चय माता सीता चरित्र लक्षुमन  वैराग्य व हनुमान भक्ती आपल्या मध्ये येण्यासाठी श्री राम प्रमाणे अनेक कष्ट सोसावे लागतात.           अयोध्येतील जनता श्री राम अयोध्येत १४ वर्षांचा वनवास संपल्यावर आले, म्हणजेच मोठी वाट पहिल्या नंतर राम राज्य आले म्हणून सर्व जनतेने दिवाळी साजरी केली .दिवाळी म्हणजे रोषणाई,रामराज्य, आनंद ,आणि सुख भरत तर राम १४ वर्षा नंतर न आल्यावर मृत्यूला सामोरे जाणार होता).         (अयोध्येत...

श्री रामानी युद्धासाठी बाली पेक्षा सुग्रीवाची निवड का केली ?

          कोणतेही मोठे लक्ष जर प्राप्त करायचे असेल तर त्यासाठी योग्य साथीदारांची साथ असणे गरजेचे आहे. कारण अंतर्गत मतभेद ,अविश्वास आणि फक्त स्वार्थ साधणारे मित्र परिवार जर सोबत असेल ,तर बाहेरील दुष्मणाशी लढून उपयोग तो काय ? पण जर आपण अनेक भारतीय वीरांचा जर विचार केला, तर त्यांनी निस्वार्थ साथीदारांची आणि योद्धाचीच निवड केली आहे.             श्री रामाचा जर विचार केला ,तर त्यांनी बाली पेक्षा सुग्रीवाची निवड केली. पण पौराणिक कथा मध्ये जर पाहिले, तर बालीने रावणाला शेपटीला बांधून सात समुद्रात स्नान केले होते. खरे पाहता बाली कडे शक्ती होती ,की त्याचे आणि त्याच्या विरोधकांचे युद्ध करताना नेत्र एकत्रित झाले ,तर सर्व वेरोधकाची शक्ती बाली मध्ये येत होती. सात विविध स्थानावर असणाऱ्या झाडाना एका बानात भेदनाऱ्याच्या हातून बालीचा वध होणार होता इतक्या शक्ती शालीबालीला सोडून श्रीरामांनी बाली कडून मार खाऊन पळालेल्या बालीचा लहाना भाऊ सुग्रीवाची मदत घेतली या मागील कारण होते ते विवेकी विचार धारेचे.            बाली  आणि...